मोकाच्या गुन्ह्यातील फरारी गुन्हेगारास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पुणे - मोकाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तुलासह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पुणे - मोकाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तुलासह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बापू रामदास मळेकर (वय 37, रा. लोहारवस्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. तो मूळ बारामती तालुक्‍यातील सोनगाव येथील रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध बारामती पोलिस ठाण्यात दरोडा, खंडणी, दुखापत करणे, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खडक पोलिस ठाण्यात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला होता. दरम्यान, तो नातेवाइकाला भेटण्यासाठी येथील वैकुंठ स्मशानभूमीजवळ मोटारीतून येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि हवालदार शरद वाकसे यांना मिळाली. त्यावरून पोलिस उपायुक्‍त बसवराज तेली आणि सहायक आयुक्‍त शरद उगले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: criminal of Mokka is arrested