esakal | पिंपरीतील मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत  
sakal

बोलून बातमी शोधा

3arrested_54.jpg

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. रवी उर्फ राजेश बंडू थोरात (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे.​

पिंपरीतील मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. रवी उर्फ राजेश बंडू थोरात (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे.

चोरलेल्या दुचाकी घरासमोर उभ्या करुन त्या विकण्यासाठी थोरात गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकींबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केली असता या दुचाकी वाकड, हिंजवडी व आकुर्डी येथून चोरल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर 90 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या.

थोरात हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत

loading image
go to top