भाजपच्या या नेत्याकडून अजित पवार यांच्यावर टीका

bala bhegade
bala bhegade

ओतूर (पुणे) : चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील बाधित क्षेत्राची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. मात्र, तरीही अजून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका माजी पुनर्वसनमंत्री बाळा भेगडे यांनी केली.  

जुन्नर तालुक्‍यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाळा भेगडे हे जुन्नर तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळामुळे जसे कोकणात आर्थिक नुकसान झाले, तसेच पुणे जिल्ह्यातही झाले आहे. कोकणाच्या धर्तीवर जिल्हातील बाधितांना व शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी. नुकसानीबाबत जुन्नरच्या तहसीलदारांशी फोनवर चर्चा केली आहे. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. 

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष तांबे, अमोल शिंदे, हरीश भवाळकर, रोहिदास भोंडवे, सुनील शहा, सुनंदा गाडगे, मयूर तुळे, प्रशांत पाबळे, नवनाथ हांडे, मनोज डुंबरे, शिवाजी डुंबरे आदी उपस्थित होते. 

या दौऱ्यावेळी बाळा भेगडे यांनी जुन्नर तालुक्‍यातील आणे, बेल्हे, राजुरी, ओतूर, जुन्नर व येणेरे या परिसरात विविध ठिकाणी भेटी देऊन बाधितांना धीर दिला. तसेच, जुन्नर तालुक्यात वादळामुळे मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व भाजपतर्फे पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com