उत्पादनवाढ, नोटाबंदीमुळे पिकांचे भाव मातीमोल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नारायणगाव - मेथी, कोथिंबीर, वालवड, घेवडा या भाजीपाला पिकांसह बटाटा, आले, फ्लॉवर, टोमॅटो या भांडवली नगदी पिकांचे बाजारभाव मातीमोल झाल्याने शेतीधंदा म्हणजे आतबट्याचा खेळ झाला असल्याची भावना जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. उत्पादनात वाढ, नोटाबंदी आणि इतर कारणांमुळे हा परिणाम झाल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी केलेल्या भाजीपाल्याची विक्री व्यापारी ग्राहकांना तीन ते चार पट जास्त भावाने करत आहेत.

नारायणगाव - मेथी, कोथिंबीर, वालवड, घेवडा या भाजीपाला पिकांसह बटाटा, आले, फ्लॉवर, टोमॅटो या भांडवली नगदी पिकांचे बाजारभाव मातीमोल झाल्याने शेतीधंदा म्हणजे आतबट्याचा खेळ झाला असल्याची भावना जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. उत्पादनात वाढ, नोटाबंदी आणि इतर कारणांमुळे हा परिणाम झाल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी केलेल्या भाजीपाल्याची विक्री व्यापारी ग्राहकांना तीन ते चार पट जास्त भावाने करत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत असला; तरी किरकोळ व्यापारी मालामाल झाले आहेत.

मी कांदा, बटाटा व आले या पिकांची लागवड केली होती. बाजारभाव न मिळाल्याने गेल्या वर्षभरात पाच लाख रुपयांचा तोटा झाला आहे. 
- राजेंद्र वाजगे, शेतकरी

Web Title: crop loss by currency ban