इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कोट्यवधींचे नुकसान

संदेश शहा
Monday, 7 September 2020

सहा सप्टेंबरला रात्री वादळी वाऱ्यासह इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तीनही गावातील १५० एकरवरील ऊस, २२५ एकर वरील डाळिंब फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. 

इंदापूर (पुणे) : सहा सप्टेंबरला रात्री वादळी वाऱ्यासह इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तीनही गावातील १५० एकरवरील ऊस, २२५ एकर वरील डाळिंब फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. 
कोरोना महामारीत शेतमालास भाव न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असतानाच वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

शेतातील उभ्या ऊसाची प्रचंड पडझड तर डाळिंब फळ व फुल गळती झाली आहे. कोरोना महामारीमध्ये शेतकऱ्याचा जोडधंदा असणाऱ्या  दुधास समाधानकारक दर नाही, मकेस भाव नाही, लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी केलेल्या उन्हाळी कांदा सारणी मधील 50% कांदा सडून गेला आहे तर कांद्याला दर देखील नाही. या संकटातून शेतकरी कसाबसा उभा राहिला असतानाच पडलेल्या पावसामुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. तसेच आर्थिक सालचांदी धोक्यात आली आहे. शेतकऱ्याच्या पिकाला आधारभूत किंमत मिळत नाही, डाळिंब पिकाचे तेल्या रोगाने नुकसान झाले असताना शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून पुन्हा डाळिंब पीक घेतले. मात्र, वादळी वारा व पावसामुळे त्याला लागलेली फुलकळी व असणारे फळ गळून पडले आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची हात द्यावा,

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँकेतून विमा कट झाला आहे. त्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवून द्यावे तसेच शेतीमाल उत्पादनास हमीभाव द्यावा अशी मागणी गोखळी येथील भैरवनाथ सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नितीन गोफणे, माऊली वाघमोडे, संजय तरंगे, सुनील बोराटे या शेतकऱ्यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops damaged due to rains in Indapur taluka