
-कल्याण पाचांगणे
माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) कारखाना पंचवार्षिक निवडणुक अनुषंगाने आज मतदानाच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्या संचालकांचे भवितव्य मत पेटीत टाकताना सभासदांमध्ये उत्साह होता. चुरसीच्या वातावरणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर सकाळी १० नंतर गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले, तर ब वर्ग संस्था मतदार संघात ९० टक्के मतदान झाले होते. या प्राप्त स्थितीमुळे मतदानाची टक्के वारी वाढण्यास मदत झाल्याचे पहावयास मिळाले.