सासवडचा तरकारी बाजार बंद; हिवरे चांबळीत भाजीसाठी ग्राहकांची गर्दी

दत्ता भोंगळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल तोडून तो रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी घेऊन बसलेले असतात. यामार्गावर बारामती पासून पुण्याला जाणारे अनेक प्रवासी या परिसरात थांबून भाजी खरेदी करताना पहावयास मिळतात. तसेच सायंकाळच्या सुमारास पुण्यातील व्यापारी छोटे टेम्पो व इतर वहाणे घेऊन या ठिकाणी भाजी खरेदी करण्यात येतात. यामुळे या परिसरात भाजी विक्रेत्यांना चांगला बाजार मिळत आहे

गराडे : सासवड (ता. पुरंदर) येथे शनिवार-रविवार असा दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत असल्यामुळे येथील भाजी बाजार बंद आहे. पण सासवड बाहेर हिवरे, चांबळी, बोपगाव व भिवरी या मार्गावर रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या शेतकरी वर्ग यांना चांगला ग्राहक असल्यामुळे त्यांचा धंदा तेजीत असल्याचे चित्र मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल तोडून तो रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी घेऊन बसलेले असतात. यामार्गावर बारामती पासून पुण्याला जाणारे अनेक प्रवासी या परिसरात थांबून भाजी खरेदी करताना पहावयास मिळतात. तसेच सायंकाळच्या सुमारास पुण्यातील व्यापारी छोटे टेम्पो व इतर वहाणे घेऊन या ठिकाणी भाजी खरेदी करण्यात येतात. यामुळे या परिसरात भाजी विक्रेत्यांना चांगला बाजार मिळत आहे असे शेतकरी व चांबळी गाव तंटामुक्त माजी अध्यक्ष भाऊसाहेब कामठे, प्रकाश भालेराव यांनी सांगितले.

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!
 

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर चांबळी गावात औषध फवारणी करण्यात येऊन मास्क व सँनेटायझर वाटप करण्यात आलेले आहे. तसेच मंगळवार व शुक्रवार असेल चांबळी गावाच्या परिसरात भाजी विकण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे अशी माहिती चांबळीचे ग्रामसेवक रमेश राऊत व ग्रामपंचायतीचे सचिव मारुती कामठे यांनी दिली.

शेतकऱ्यांना दारातच बाजारपेठ
हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी या परिसरात पावसाची हजेरी बऱ्यापैकी बर्यापैकी झाल्यामुळे झाल्यामुळे इथे पाण्याचा सोर्स सध्या उपलब्ध आहे. यामुळे शेतात तरकारी पिके  असल्यामुळे शेतकरी समाधानी असल्याचे चांबळीचे शेतकरी व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कटके यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd of customers for vegetables at Hiware Chambli as Saswad market is closed