संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
गुरुवार, 24 जानेवारी 2019

जुन्नर -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त (गुरुवार) रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अष्टविनायक गिरिजात्मकाचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

जुन्नर -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त (गुरुवार) रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अष्टविनायक गिरिजात्मकाचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दिवसभरात पंधरा हजाराहून अधिक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते. श्रीच्या मूर्तीस व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ६ व दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. 

दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Web Title: A crowd of devotees to the lenyadri