

‘सीआरपीएफ’मध्ये पुन्हा
लान्स नाईक, नाईक पदे
जवानांच्या पदोन्नतीसाठी प्रस्ताव विचाराधीन
नवी दिल्ली, ता. १७ (पीटीआय) : लष्कराच्या धर्तीवर केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये (सीआरपीएफ) लान्स नाईक आणि नाईक ही पदे पुन्हा अस्तित्वात येणार आहेत. सुमारे ३० वर्षांपूर्वी ही पदे रद्द करण्यात आली होती. मात्र, पदोन्नतीला लागणारा वेळ आणि लष्करातून निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना सामावून घेण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे.
‘सीआरपीएफ’ने १९९७ मध्ये ही पदे रद्द केली होती आणि पोलिस दलांप्रमाणे शिपाई व हवालदार अशी पदे लागू केली होती. मात्र, लष्करामध्ये लान्स नाईक आणि नाईक ही दोन्ही पदे आजही अस्तित्वात आहेत. त्यातील श्रेणीनुसार, जवान भरती झाल्यानंतर पाच वर्षांनी लान्स नाईक होतो आणि दहा वर्षांनंतर त्यांना नाईक म्हणून पदोन्नती देण्यात येते. तसेच, २० वर्षांनंतर हवालदार पदावर पदोन्नती होते. मात्र, ‘सीआरपीएफ’मध्ये दोन्ही पदे रद्द झाल्यानंतर, पहिली पदोन्नती पदोन्नती मिळण्यासाठी २२ ते २५ वर्षांचा काळ लागत असल्यामुळे शैथिल्य येत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर, हा बदल करण्यात येणार आहे. ही दोन्ही पदे अस्तित्वात आल्यानंतरही हवालदार पदापर्यंत पदोन्नती मिळण्यासाठी दीर्घ कालावधी लागेल, त्यामुळे जवानांमधील अस्वस्थता कमी होणार नाही; मात्र त्यांचे मनोबल कायम राहण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरातील तळांवर संबंधितांच्या बैठका किंवा सैनिक संमेलन घेऊन दोन दिवसांत सर्वांची मते जाणून घेण्यात यावीत, अशा सूचना ‘सीआरपीएफ’च्या मुख्यालयाकडून करण्यात आल्या आहेत.
पदांमध्ये करण्यात येणारे बदल वरवरचे नाहीत, तर त्यातून बटालियनची शिस्त कायम राहण्यासही मदत होईल, असा विश्वास एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. तर, जवानांना निश्चित कालमर्यादेमध्ये पदोन्नती मिळाली, तरच या प्रस्तावित बदलांचा फायदा होईल; अन्यथा हा निर्णय निष्फळ ठरेल, असे निमलष्करी निवृत्त जवानांच्या संघटनेचे सरचिटणीस रणबीरसिंह यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.