बलात्कारपीडित फितूर झाल्यानंतरही दोषीला शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

अल्पवयीन पुतणीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यादरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांनी ही शिक्षा सुनावली.

पुणे - अल्पवयीन पुतणीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यादरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांनी ही शिक्षा सुनावली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी पाच वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १३ ऑगस्ट २०१३ रोजी पौडमधील मुगाव परिसरात घडली होती. संबंधित मुलगी आपल्या आई-वडील आणि दोन भावासोबत राहत होती. मुलीचे आई-वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी तिच्या आईने मुलीला त्याच गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे सोडले व त्यानंतर त्या कामाला गेल्या होत्या. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर मुलगी घाबरून रडत असल्याचे आईने पाहिले. त्या वेळी तिच्याकडे विचारपूस केली असता दुपारी तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यामुळे मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीवर बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फोन टॉपिंग म्हणजे मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम : थोरात

या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे आणि ॲड. जावेद खान यांनी पाहिले. न्यायालयाने एकूण १० साक्षीदार तपासले. आरोपीला १० हजार रुपयांचा दंड पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेत शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The culprit is punished after being raped