पुणे : एक फ्लॅट अन् सहा दुकानांवर चोरट्यांनी मारला डल्ला!

Thief
Thief
Updated on

पुणे : बंद सदनिकेचे कूलुप तोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. याबरोबरच चोरट्यांनी रस्त्याच्याकडेला असणारी वेगवेगळी सहा दुकाने फोडून तेथेही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी खुशाल मुंदडा (वय 31, रा. बिबवेवाडी) यांनी सहकानरगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची धनकवडी येथे सदनिका आहे. फिर्यादी हे काही कामानिमित्त बुधवारी रात्री बाहेर गेले होते.

मध्यरात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कूलुप कशाच्यातरी सहाय्याने उघडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेली साडे आठ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली.

याबरोबरच धनकवडी येथील श्री हॅन्डलूम, श्री बालाजी एब्रॉयडरी, पुणे-सातारा रस्त्यावलगत असलेले ऍपल सलून, बेस्ट कलेक्‍शन, चव्हाण नगरमधील पंचवटी सोसायटीजवळ असलेल्या ब्लू डायमंड, मेट्रो इलेक्‍ट्रॉनिक शॉपी या ठिकाणीही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com