esakal | Coronavirus : हृदयस्पर्शी! पेशंटवर उपचार करण्यासाठी त्याने लग्न पुढे ढकलले अन्...!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

बीजिंगच्या फक्सिंग हॉस्पिटलमधील ३६ जणांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे राजधानीतील नागरिक हळूहळू कामावर परतत आहेत.

Coronavirus : हृदयस्पर्शी! पेशंटवर उपचार करण्यासाठी त्याने लग्न पुढे ढकलले अन्...!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वुहान : गेल्या काही दिवसांपासून कोरोना या व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. त्याची धास्ती जगभरातील अनेक देशांनी घेतलेली आहे. चीन सरकारला कोरोनावर नियंत्रण आणण्यात अद्यापपर्यंत अपयश आले आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत भर पडत चालली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीजिंगमधील २९ वर्षीय तरुण डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२१) घडली. जियांग्झिया जिल्ह्यातील एक हॉस्पिटलमध्ये पेंग येन्हुआ हा अतिदक्षता विभागात काम करत होता. 

- Coronavirus: कोरोनाग्रस्त डायमंड प्रिन्सेस जहाजावर जपाननं वाटले 2 हजार आयफोन

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पेंगने आपले लग्न पुढे ढकलले होते. याची चर्चाही स्थानिक माध्यमांमध्ये झाली होती. मात्र, रुग्णांवर उपचार करणारा पेंगच कोरोनाचा बळी ठरला. कोरोनाची लागण झाल्यानंतर २५ जानेवारीला पेंगला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० जानेवारीला त्याची तब्येत खालावल्यानंतर त्याला वुहानमधील जिनिग्टन हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी (ता.२०) रात्री पावणे दहाच्या सुमारास पेंगची प्राणज्योत मालवली.  

रुग्णांमध्ये वाढ

चीनमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ११०९ नागरिकांची कोरोना संसर्गग्रस्त म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ३९४ जणांची एकाच दिवशी नोंद झाली होती. याबरोबर चीनमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७४,६८५ वर पोचली आहे, तर मृतांचा आकडा २२३६ वर पोहोचला आहे.

- सभेसाठी एक कोटी नागरिक येणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

चीनी तुरुंगांनाही कोरोनाचा विळखा

हुबेई प्रांतातील एका तुरुंगात २२० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अजून ५१ जण संशयित आहे. त्यांना कधी लागण झाली याबाबत काही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे चीनमधील जवळपास २७१ जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यापैकी २३० महिला आहेत. परिणामी, वुहान तुरुंग प्रमुखांना बडतर्फ करण्यात आले आहे.  

त्यानंतर पूर्वेकडील शेंडोंग प्रांतातील रेचेन्ग कारागृहातील २०० कैदी आणि सात तुरुंग अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. तर दक्षिणेकडील झिझियांग प्रांतातील शिलीफेंग कारागृहातील ३४ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे दोन तुरुंग अधिकारी, शेंडोंग प्रांतातील न्याय विभागाचे सात तुरुंग अधिकाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे. 

- पेट्रोलच्या दरात वाढ; नवे दर शंभरी पार

दरम्यान, बीजिंगच्या फक्सिंग हॉस्पिटलमधील ३६ जणांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे राजधानीतील नागरिक हळूहळू कामावर परतत आहेत. दुसरीकडे पीकिंग युनिव्हर्सिटीतील पीपल्स हॉस्पिटलमधील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. हे तिनही रुग्ण एकाच कुटुंबातील असून त्यापैकी एकजण मूत्रपिंडाच्या व्याधीने ग्रस्त असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top