esakal | पुण्याची संस्कृती येणार नकाशावर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुण्यातील सांस्कृतिक वैविध्याचे संरक्षण करण्यासाठी मॅपिंग महत्त्वाची बाब आहे. तंत्रज्ञान आणि संस्कृती आपल्या मूलभूत मुल्यांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या या प्रकल्पाला आमचे पाठबळ आहे.
- वॉरेन हॅरिस, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, टाटा टेक्‍नॉलॉजीज

पुण्याची संस्कृती येणार नकाशावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

मॅपिंगच्या बीटा आवृत्तीचे अनावरण मंगळवारी औपचारिकरीत्या झाले. https://www.sahapedia.org/ या वेबसाइटवर बीटा मॅप उपलब्ध आहे. पुरातत्त्व वास्तू, संग्रहालये, साहित्यिक व शैक्षणिक संस्था, नैसर्गिक सौंदर्यासह २४ महत्त्वाच्या बाबींचे मॅपिंग होणार आहे. त्यासाठी ४५ हून अधिक नामांकित संस्थांकडून संबंधित विषयाची विश्वासार्ह माहिती घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर ती दोन टप्प्यात पुरविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एखाद्या घटकाची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात त्या घटकाशी निगडित असलेले संदर्भ दिले जातील. ‘टाटा टेक्‍नॉलॉजीज लि. या प्रकल्पासाठी भागीदार असून ‘मॅप माय इंडिया’च्या सहयोगाने मॅपिंग केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या पुण्यातील प्रमुख मुग्धा येलकर-केकरे यांनी दिली.

पुणे : शेतकरी मारहाण प्रकरण; सराईतासह दोघांवर गुन्हा दाखल

कल्चरल मॅपिंग म्हणजे काय?
एखाद्या नवीन शहरात गेल्यानंतर तेथील सांस्कृतिक बाबी जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र, अशी खात्रीशीर माहिती देणारे डिजिटल माध्यम उपलब्ध नाही. कल्चरल मॅपिंगद्वारे सर्व ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती जमा केली जाईल व ती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल.

कडकनाथ फसवणूक प्रकरण; महारयत ऍग्रोच्या संस्थापकास अटक

loading image