esakal | शिवभक्तांनो, महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरला जाताय? मग ही बातमी वाचाच

बोलून बातमी शोधा

BhimaShankar}

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट मार्फत केली जाईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी सांगितले.

pune
शिवभक्तांनो, महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरला जाताय? मग ही बातमी वाचाच
sakal_logo
By
डी. के. वळसे-पाटील

मंचर (पुणे) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार (ता.१०) ते शुक्रवार (ता.१२) पर्यंत संचारबंदी राहिल, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत, अशी माहिती घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.

Breaking: रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात तिप्पटीने वाढ; गोंधळानंतर रेल्वे मंत्रालयाचा खुलासा​

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट मार्फत केली जाईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी सांगितले. “श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ अन्वये आदेश जारी केले आहेत. त्यात नमूद केल्यानुसार श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रस्त्यावर, संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे या सर्व कृत्यांसाठी मनाई असणार आहे, त्यामुळे भाविकांनी येथे येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पूजा चव्हाण प्रकरण : भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले​

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात येऊ नये, पण यात्रा कमिटीच्यावतीने ऑनलाईन दर्शन प्रणालीचा वापर करून भाविक भक्तांना मोबाईल ॲपद्वारे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत, तसेच सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूक आणि पालख्या काढण्यात येऊ नये,” असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी भीमाशंकर ट्रस्टचे पदाधिकारी प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करतील, असे कौदरे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)