esakal | पूजा चव्हाण प्रकरण : भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले

बोलून बातमी शोधा

Pooja_Chavan}

भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ॲड. ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते.

पूजा चव्हाण प्रकरण : भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Pooja Chavan Suicide case: पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी दाखल झालेले दोन्ही खटले न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले.

Corona Updates: लसीकरण आणखी स्वस्त होणार, भारत बायोटेकने दिली मोठी खुशखबर!​

भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ॲड. ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार या प्रकरणात दोन खासगी दावे देखील झाले होते. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते.

भारतीयांच्या हाती अमेरिकेची सूत्रे; राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं कौतुक​

पूजा यांच्या आत्महत्येनंतर माजीमंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यात असलेल्या संभाषणावरून तसेच त्यांच्यातील संबंधाबाबत असलेल्या चर्चेवरून हे प्रकरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

समाज माध्यमावर उपलब्ध असलेले फोटो आणि व्हायरल झालेले कॉल रेकॉर्डिंग यावरून गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा तपास अद्याप सुरू आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

मोठी बातमी : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील गुंठेवारीचा प्रश्न सुटणार!

गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रारअर्ज केला होता. त्याची पोहच पावती न्यायालयात दाखल केली आहे. मात्र पोलिसांना त्याची दखल घेतली नव्हती. न्यायालयाने दिलेल्या या निकालाच्या विरोधात आम्ही सत्र न्यायलयात दाद मागणार आहोत.
- ॲड. ईशाना जोशी, अध्यक्षा, भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)