चार फुटांची शेवग्याची शेंग बघण्यासाठी उत्सुकता

महेंद्र शिंदे
सोमवार, 25 जून 2018

खेड-शिवापूर - वेळु (ता.भोर) येथील गुलाब घुले यांच्या शेतातील शेवग्याच्या झाडाला तब्बल साडे चार फुटांची शेंग लागली आहे. त्यांच्या शेतातील शेवग्याची झाडे पाहण्यासाठी परीसरातील अनेक गावातील शेतकरी येत आहेत. 

वेळु येथील गुलाब घुले हे प्रयोगशील शेतकरी आहेत. कोणत्याही रासायनिक खते आणि औषधांचा वापर न करता ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. त्यानुसार ते आपल्या शेतात खत म्हणून घरी बनविलेले जीवामृत वापरतात. 

त्यांच्या शेतात सध्या सुमारे दीड वर्षाची पंधरा शेवग्याची झाडे आहेत. त्या झाडांनाही घुले खत म्हणून जीवामृत देतात. सध्या या शेवग्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. त्यातील चार झाडांना चार-चार फुटांच्या शेंगा लागल्या असून त्यातील एक शेंग तब्बल साडे चार फुटांची आहे. त्यांच्या शेतातील या शेवग्याच्या शेंगा पाहण्यासाठी परीसरातील शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता पाळेकर तंत्रज्ञान वापरून मी नैसर्गिक शेती करतो. त्यानुसार जीवामृत देऊन या शेवग्याच्या झाडांची जोपासना केली आहे. जीवामृतचा वापर केल्यानेच शेवग्याच्या शेंगा चार फुटांपेक्षा जास्त वाढल्या असल्याचे घुले यांनी सांगितले.

Web Title: Curiosity to see a four foot long Drumstick