नोटाबंदीने काळा पैसाधारक हवालदिल - माधव भांडारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

‘नोटबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. या निर्णयाला तीन वर्षे होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसाधारक हवालदिल आहेत. नोटाबंदी हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय असून, हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे आहे,’’ असे मत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी येथे व्यक्त केले.

पुणे - ‘नोटबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. या निर्णयाला तीन वर्षे होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसाधारक हवालदिल आहेत. नोटाबंदी हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय असून, हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे आहे,’’ असे मत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी येथे व्यक्त केले. 

प्रा. विनायक आंबेकर लिखित ‘नोटसम्राट-नोटाबंदीची सुरस कथा’ या कादंबरीचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अग्निपंख प्रकाशन आणि शुभम साहित्यतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे उपस्थित होते. 

भांडारी म्हणाले, ‘‘गुजरातच्या २०१२ च्या  विधानसभा निवडणुका ते २०१४ च्या लोकसभा निवडणुका या मधल्या काळात नोटाबंदीच्या निर्णयाची प्रस्तावना झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्‍लेषकांनी हा कालावधी सोडून दिला. याच दोन वर्षांत पडद्यासमोर आणि पडद्यामागे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाला वळण देणाऱ्या अनेक घटना घडल्या. बाजारपेठेतील खोट्या नोटांच्या सुळसुळाटामुळे अर्थकारणावर विपरीत परिणाम दिसू लागल्यानेच डावे-उजवे भेद विसरून अर्थतज्ज्ञांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करा, अशी मागणी केली. नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी आली, हा सर्रास विपर्यास आहे.’’ 

या वेळी खरे आणि अजित अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक आंबेकर यांनी पुस्तकाची भूमिका विशद केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: currency ban black money madhav bhandari