घराच्या गेटला विजेचा करंट

रमेश मोरे
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटी गल्ली क्रं 9 येथील रहिवाशी उज्वला सहाणे यांच्या घराच्या गेटला महावितरणच्या डी.पी. बॉक्समधुन करंट येत असल्याचे लक्षात आले. भल्या सकाळीच त्यांचे पती केशव सहाणे हे गेटचे कुलुप उघडायला गेले असता त्यांना विज प्रवाहाचा धक्का जाणवला. ही गोष्ट सहाणे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी टेस्टरच्या साहाय्याने गेटच्या करंटची खातरजमा केली. गेटच्या कुलपाला टेस्टर लावले असता त्यातुन करंट स्पार्क होत असल्याचे लक्षात आले प्रसंगावधान राखुन त्यांनी हातात प्लॅस्टीक घालुन गेटचे कुलुप उघडुन गेट मोकळे केले. 

मधुबनमधील काही रस्त्यांची वारंवार केलेल्या कामांमुळे उंची वाढुन घरे खाली गेली आहेत. काही ठिकाणी रस्ता व घरांचे आंगण समांतर झाले आहे. येथील रस्त्याचे काम सुरू आहे. यातच महावितरणकडुन बसविण्यात आलेल्या विद्युत डी. पी. बॉक्स खाली पाणी मुरत असल्याचे केशव सहाणे यांनी सांगीतले. अनेकदा तक्रार करूनही किरकोळ दुरूस्ती करण्यापलिकडे महावितरणकडुन येथे ठोस उपाय योजना करण्यात आली नसल्याचे सहाणे कुटुंबियांनी सांगीतले. प्रसंग लक्षात आल्याने खबरदारी घेतल्याने अपघात टळल्याचे ते सांगतात. तर अशा घटना घडल्यास महावितरण कार्यालयातील कर्मचारी फोन उचलत नाहीत याचा प्रत्यय वारंवार येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळी ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी महावितरणच्या सांगवी कार्यालयाला फोन केला. मात्र पलिकडुन प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास त्यांनी ही गोष्ट सांगीतली. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्याच्या वैयक्तिक क्रंमाकावर संपर्क साधुन येथील विजपुरवठा खंडीत करून दुरूस्ती केली. मात्र पुन्हा पुन्हा असे होवु नये यासाठी महावितरणकडुन येथे ठोस उपाययोजना करावी अशी सहाणे कुटुंबियांकडुन मागणी होत आहे. 

रस्त्याच्या कामामुळे डी. पी. बॉक्स मधील केबल ताणली गेली होती. त्यामुळे ती वायर गेटला चिकटल्याचे स्थानिक कर्मचाऱ्याने सांगीतले. येथील दुरूस्ती करण्यात आली आहे. 
- एस.पी.उचेकर अभियंता सांगवी विभाग

Web Title: current of electricity in the gate of the house