esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

children-learn-coding

आपल्यापैकी अनेकजणांचे बालपण निसर्गाच्या सहवासात खेळण्या-बागडण्यात गेले आहे. त्याचा अनेकांना अभिमानही असतो. पण, आताची पिढी खेळणे सोडून ‘कोडिंग’ शिकण्यामध्ये बिझी आहे.कोरोनामुळे सध्या शाळा ऑनलाइन सुरू आहेत.

आताची पिढी खेळणे सोडून ‘कोडिंग’ शिकण्यामध्ये बिझी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सीबीएसई शाळेत सोहम सहावीत शिकत आहे. शाळेत कोडिंगचे स्वतंत्र क्‍लासेस आहेत. पण त्याला त्यात अधिक आवड असल्याने कोडिंगसाठी खासगी क्‍लास लावला आहे. भविष्यात त्याला त्यात रस वाटला, तर त्याला करिअर करणे सोपे जाईल, असे सोहमच्या आई अनुराधा आव्हाड सांगत होत्या. अशाप्रकारे पालकही आपल्या मुलांना काळाची गरज ओळखून कोडिंग शिकविण्यात रस घेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संगणकाच्या शोधानंतर वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये झपाट्याने बदल होत गेले. त्यामुळेच विविध पिढ्यांना ‘बेबी बूमर्स’, ‘मिलेनियल’, ‘जनरेशन एक्‍स, वाय, झेड’ असे मानले जाते. १९९५ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या पिढीला जनरेशन झेड मानले जाते तर २०१३ नंतर जन्मलेल्या मुलांची ‘अल्फा’ जनरेशन सुरू आहे. साधरणत: नऊ वर्षांपुढील किंवा तिसरी, चौथीपासूनच मुलांना कोडिंगचे धड दिले जात आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्यापैकी अनेकजणांचे बालपण निसर्गाच्या सहवासात खेळण्या-बागडण्यात गेले आहे. त्याचा अनेकांना अभिमानही असतो. पण, आताची पिढी खेळणे सोडून ‘कोडिंग’ शिकण्यामध्ये बिझी आहे.कोरोनामुळे सध्या शाळा ऑनलाइन सुरू आहेत. परिणामी मुलांना भरपूर मोकळा वेळ मिळाला आहे. या वेळेत मोबाईल, लॅपटॉप, व्हिडिओ गेममध्ये वेळ घालविण्यापेक्षा हे विद्यार्थी प्रोग्रामिंगकडे वळत आहेत. ‘लॉकडाउन दरम्यान कोडिंग शिकणाऱ्यांच्या प्रवेश संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘प्रोग्रॅमिंग’ शिकल्याने मुलांमध्ये होणारे बदल
ॲप, ॲनिमेशन फिल्म आणि व्हिडीओ बनविणे 
लॉजिकल थिंकिंग
‘स्क्रीन टाइम’ वाढतो
कामगिरीत सुधारणा 
गणितातील रस वाढतो
कल्पनाशक्तीला मिळतो वाव

सीबीएसई, आयसीएसई, आयबी शाळांमध्ये प्रोग्रामिंग लॅंग्वेज स्वतंत्रपणे शिकवितात. मुलांना स्वत:हून त्यात अधिक रस वाटतो. म्हणून ते कोडिंगच्या क्‍लासकडे वळत आहेत. भविष्याची गरज म्हणून, त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा, यासाठी पालक मुलांना हे क्‍लासेस लावतात.  
- संगीता बनगिनवार, ‘कोडिंग’ प्रशिक्षक

loading image
go to top