जागतिक वन दिनाच्या दिवशीच मोशी प्राधिकरणामध्ये झाली दोन वृक्षांची कत्तल...

रात्री कटर व झाडे तोडण्याच्या साहित्यांनी ही झाडे रात्रीच्या वेळी तोडली असल्याचे काही नागरीकांना सांगितले.
cutting down trees
cutting down trees

मोशी : जगातील सर्व देशांमध्ये सोमवारी (ता. 21) वृक्षारोपण करुन जागतिक वनदिन व मंगळवारी (ता. 22) जागतिक जलदिन साजरा होत होता साजरा होत असतानाच मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 6 मधील दसरा चौकापुढील संत साई चौकामध्ये मात्र रात्रीच्या वेळी दोन झाडांची निर्घृणपणे कत्तल करण्यात आली असल्याची येथील नागरिकांनी कळविले आहे. सोमवारी (ता.21) व मंगळवारी रात्री (ता.22) अशा दोन रात्री कटर व झाडे तोडण्याच्या साहित्यांनी ही झाडे रात्रीच्या वेळी तोडली असल्याचे काही नागरीकांना सांगितले.

आज पहाटेच्या अंधुक प्रकाशात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या नागरिकांना ज्या वेळी दिसली त्यावेळी अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पूर्ण वाढ झालेली ही मुचकुंद नावाची ही दोन झाडे असून ऐन उन्हाळ्यात ही झाडे सध्या येथील पांथस्तांना सावली देण्याचे काम करत होती. मात्र गेल्या दोन दिवसांत आणि विशेषतः सोमवारी जागतिक वन व वृक्षसंवर्धन आणि जागतिक मंगळवारी जागतिक जल दिनाच्या दिवशीच ही झाडे निर्दयीपणे तोडून भर रस्त्यातच टाकलेली असल्याने येथून ये जा करणारे नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.

रात्रीच्या वेळी जेव्हा ही झाडे तोडण्याचा प्रकार सुरू होता तेव्हा अनेक नागरिकांना खिडकीतून तोडण्याचा आवाज आणि झाडे तोडत तोडत आना हादरे बसत होते म्हणून झाडांवरील पक्षी उडून ओरडण्याचा आवाज येत होता आणि हिजाडे जेव्हा खाली पडली तेव्हा त्यावरील घरट्यामध्ये असलेले पक्षी आणि त्यांची अंडी फुटून अनेक पक्षीही यामध्ये दगावल्याचे काही या वेळी वृक्षप्रेमी विठ्ठल वाळुंज यांनी सांगितले.

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने या तोडलेल्या झाडांची चौकशी करुन ही झाडे तोडणारांवर कडक कारवाई करण्याची मागणी येथील वृक्षप्रेमी व भूगोल फाऊंडेशनचे विठ्ठल वाळुंज, प्रशांत राऊळ याबरोबरच स्थानिक नागरीकांनी केली आहे.

हुंदका आवरता आला नाही....

''ज्या वृक्षांमुळे पाऊस पडून आपणास प्यायला पाणी मिळते, झाडांमुळे आपणास पाने, फुले, फळे व सावली मिळते अशा वृक्षांचा सर्वत्र जागतिक वन व जल दिनानिमित्त वृक्षारोपण करणे, पाणी घालत त्याचे संवर्धन करणे असे करणे आवश्यक असताना मात्र याच दिवशी पूर्ण वाढलेल्या झाडांची निर्घृणपणे कत्तल करणे ही बाब अक्षम्य व निंदनीय आहे. पडलेल्या झाडांमुळे अनेक पक्षी बेघर झाले आहेत तर अनेकांनी जन्म घेण्याअगोदरच या जगाचा निरोप घेतला आहे. हे सांगत असताना वृक्षप्रेमी विठ्ठल वाळुंज यांना हुदका आवरणे कठीण झाले होते.''

- विठ्ठल वाळुंज, संस्थापक : भूगोल फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com