Baramati News : जागरुक बारामतीकरांकडून होतोय सीव्हिजील सिटीझन अँपचा प्रभावी वापर.....

आगामी लोकसभा निवडणूकीत पारदर्शकता यावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने विकसीत केलेल्या सीव्हिजिल सिटीझन अँपचा बारामतीत नागरिकांकडून प्रभावी वापर करण्यात येत आहे.
cvigil citizen app
cvigil citizen appsakal

बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीत पारदर्शकता यावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने विकसीत केलेल्या सीव्हिजिल सिटीझन अँपचा बारामतीत नागरिकांकडून प्रभावी वापर करण्यात येत आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून आजवर 26 तक्रारी या अँपवर प्राप्त झाल्या असून त्यांचे निराकरणही केले गेले. या अँपवरच्या तक्रारीचे निराकरण न केल्याने एका विस्तार अधिका-याविरुध्द पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. काहीवेळेस या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येते. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

बारामतीतही जागरुक नागरिकांनी फोटोसह आचारसंहिता उल्लंघनाबाबत प्रशासनाला जागे केले. काही तक्रारीत तथ्य होते, तेथे तत्काळ दुरुस्ती करण्यात आली, काही तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचेही आढळल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com