Crime News : 25 लाखाच्या लॉटरीपायी गमावले 46 लाख रुपये ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : 25 लाखाच्या लॉटरीपायी गमावले 46 लाख रुपये !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्हाटस्‌अप संदेशाद्वारे 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तरुणास वेगवेगळी कारणे सांगून सायबर गुन्हेगारांनी तब्बल 46 लाख 35 हजार रुपयांना गंडा घातला. वडीलांच्या निवृत्तीनंतर मिळालेली रकमेच्या मुदत ठेवीवर कर्ज काढून पैसे भरल्याचा धक्कादायक प्रकार पुढे ेआला आहे.

हेही वाचा: ‘दंगली घडविणाऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाता काम नये’

याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 34 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा मार्केट यार्ड येथील एका गाळ्यावर दिवाणजी म्हणून काम करतो. तर त्याचे वडील पोलिस दलातुन निवृत्त झाले आहेत. त्याच्या मोबाईलवर 22 मे 2021 या दिवशी व्हॉटसअपवर 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश प्राप्त झाला. त्याने संबंधीत व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यास 25 लाख रुपये मिळण्यासाठी विविध प्रकारचे शुल्क भरणे आवश्‍यक असल्याचे सांगून वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्याने त्याच्याकडील पैसे भरल्यानंतर त्याने वडीलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेली व मुदत ठेवीमध्ये ठेवलेल्या रकमेवरही कर्ज काढले.

हेही वाचा: सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कर्जातुन मिळालेली रक्कमही त्याने आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर पैसे भरले. अशी एकूण 46 लाख 35 हजार रुपयांची रक्कम त्याने भरली. त्यानंतरही लॉटरीचे पैसे मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बिबवेवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

loading image
go to top