सायबर सुरक्षेत भारत अग्रेसर - डॉ. दरबारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

डॉ. भटकर म्हणाले 
  देशात कृषिप्रधान ते ज्ञानप्रधान, असे होतेय परिवर्तन
  भविष्यातील आव्हाने सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे
  राष्ट्रीय स्तरावरील अनेक अभियानाला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘सी-डॅक’ बजावतेय महत्त्वाची भूमिका

पुणे - ‘सायबर सुरक्षेमध्ये जगभरातील प्रगत देशांच्या तुलनेत भारत अग्रेसर आहे. सायबर सुरक्षा अद्ययावत असावी आणि सक्षम असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अन्य देशांपेक्षा भारत सायबर सुरक्षिततेत ५० टक्‍क्‍यांहून अधिक चांगले काम करीत आहे,’’ असा विश्‍वास ‘सी-डॅक’चे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी व्यक्त केला.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्यातर्फे ‘प्रगत संगणकशास्त्र’ विषयातील ‘टेक कॉन्क्‍लेव्ह १९’ या दोनदिवसीय परिषदेचे उद्‌घाटन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. दरबारी बोलत होते. या विषयांशी संबंधित १७ स्टार्टअपची दालने मांडली आहेत.

डॉ. भटकर म्हणाले 
  देशात कृषिप्रधान ते ज्ञानप्रधान, असे होतेय परिवर्तन
  भविष्यातील आव्हाने सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे
  राष्ट्रीय स्तरावरील अनेक अभियानाला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘सी-डॅक’ बजावतेय महत्त्वाची भूमिका

Web Title: Cyber Security India C-Dac Tech Conclave 19