राज्यातील सहकारी बॅंकांची सायबर सुरक्षा होणार स्ट्राॅंग...

Cyber_Crime.jpg
Cyber_Crime.jpg
Updated on

पुणे : राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या सहकारी बॅंकांना सायबर गुन्हेगारांपासून असणारा धोका लक्षात घेऊन आता या बॅंकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी आता महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेनेच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी 5 कोटी रूपयांची तरतुद करुन अद्ययावत सायबर तंत्रज्ञानाचा उपयोग करुन राज्य सहकारी बॅंक सायबर सिक्युरिटी ऑपरेश सेंटर निर्माण आहे. ही सेवा राज्यातील सर्व सहकारी बॅंकांना उपलब्ध करुन देत त्यांचे सायबर संरक्षण करणार आहे.

लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्हेगारांकडून राज्याच्या ग्रामीण भागात चांगले नेटवर्क असलेल्या काही सहकारी बॅंकांना लक्ष्य करण्यात आले. संबंधित बॅंकांच्या सायबर सुरक्षा सिस्टिममधील कमकुवतपणा लक्षात घेऊन सायबर गुन्हेगार, हॅकर यांनी बॅंकांचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. यापूर्वीही राज्यातील अनेक सहकारी बॅंकां, पतसंस्था, वित्तीय संस्था यांना सायबर गुन्हेगारांकडून फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये ही काही घटना घडल्या, तर भविष्यात देखील सहकारी बॅंकांवर सायबर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी बॅंकांची शिखर बॅंक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडून मागील काही महिन्यापासुन पावले उचलली जात आहेत. त्यानुसार, राज्य सहकारी बॅंकेचे सॉफ्टवेअर, डेटा सेंटर, हार्डवेअर 8 ते 9 वर्षे जुने होते. आता त्याचे नुतणीकरण केले जात आहे. त्यामध्ये अद्ययावत सॉफ्टवेअर, वेब अप्लिकेशन, फायरवॉलचा समावेश आहे. तसेच बॅंक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरही अद्ययावत करत असल्याने डेटा सेंटरमध्ये जेवढे सर्व्हर आहेत, त्यामध्ये बाहेरुन येणारे व्यवहार व अंतर्गत व्यवहार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवुन सायबर हल्ले रोखणे शक्य होणार आहे. सायबर सुरक्षेसाठी सहकारी बॅंकांना एक ते दिड कोटी रुपये खर्च येतो, तर 60 ते 70 हजार रुपयाचा पगार खर्च करणे परवडत नाही. त्यामुळे अशा राज्य सहकारी बॅंकेच्या सदस्य असणाऱ्या सहकारी बॅंकांना त्याचा फायदा होणार आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


- सायबर हल्ला अलर्ट देणारी यंत्रणा लवकरच होणार पूर्ण
- सायबर सुरक्षेसाठी 24 तास सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट/ऑपरेटरची टीम ठेवणार लक्ष
- अद्ययावत तंत्रज्ञामुळे सायबर धोके लक्षात येण्याबरोबरच सहकारी बॅंकांना ग्राहकांना जलदगतीने सेवा देणे होणार शक्य
- सहकारी बॅंकांना अत्यल्प दरात मिळणार सेवा

 

"राज्य सहकारी बॅंक ही शिखर बॅंक असल्याने आम्हाला राज्यातील सहाकरी बॅंकांना सेवा देणे आवश्यक आहे. या बॅंकांना सायबर गुन्हेगारांचा धोका लक्षात घेऊनच आम्ही सायबर सुरक्षेचा आराखडा केला आहे. आमच्या कोअर बॅंकिंग सिस्टिमसाठी (सीबीएस) 30 कोटी व सहकारी बॅंकांच्या सायबर सुरक्षेसाठी 5 कोटी अशी  तरतूद केली आहे. अद्ययावत दर्जाच्या सायबर सिक्युरीटी ऑपरेशन सेंटरद्वारे ज्यांना खरोखरच गरज आहे, अशा सहकारी बॅंकांना सेवा दिली जाणार आहे."

-विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक.


राज्यातील सहकारी बॅंका
* जिल्हा बॅंका - 31
* सहकारी बॅंका - 498
* पतसंस्था  - 24 हजार 500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com