जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सायकल रॅली

मिलिंद संगई
रविवार, 26 मे 2019

विविध उपक्रमांचे आयोजन
आजपासून पूर्ण महिना तंबाखूविरोधी महिना म्हणून उपक्रमांचे आयोजन इंडियन डेंटल असोसिएशनकडून केले जाणार आहे. व्याख्यानांसह वॉकींग रॅली, पथनाट्य असे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. 

बारामती : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून येथील इंडीयन डेंटल असोसिएशनची बारामती व फलटण शाखा तसेच बारामती सायकल क्लबच्या वतीने आज (ता. 26) तंबाखू विरोधी दिन सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, मेडीकोज गिल्ड तसेच न्यू बारामती सायकल क्लब सह अनेक संस्थांचे सदस्य रॅलीमध्ये सहभागी झाले होते. 

तंबाखूने दरवर्षी कर्करोगामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. विविध माध्यमांतून होणारे तंबाखू सेवन आरोग्याला अपायकारक आहे, हा संदेश समाजामध्ये प्रभावीपणे जावा या उद्देशाने तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तंबाखूने होणारे दुष्परिणाम अधोरेखीत करुन लोकांना या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने आज बारामती सायकल क्लब व न्यू बारामती सायकल क्लबच्या सदस्यांनी हा संदेश देत बारामती ते एमआयडीसी व परत पूनावाला बागेपर्यंत ही रॅली केली. या प्रसंगी तंबाखूसेवन न करण्याची शपथ सर्वांनी घेतली. 

सायकल रॅलीच्या समारोपास नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, इंडियन डेंटल असोसिएशन बारामती फलटण शाखेच्या अध्यक्षा डॉ. वैशाली कोकरे, बारामती सायकल क्लबचे अँड. श्रीनिवास वायकर व महेश जाधव, डॉ. प्रदीप व्होरा, डॉ. राजेंद्र दोशी, डॉ. आशुतोष आटोळे, डॉ. नेत्रा सिकची, डॉ. मंदार पाटील, डॉ. सौरभ दोशी, डॉ. रोहीत संघवी, डॉ. अशोक व्होरा, डॉ. चेतन गुंदेचा, डॉ. ऋतुजा पिसे, डॉ. मोहन पाटील, डॉ.चित्रा खरसे, डॉ.सूरज चव्हाण, डॉ. विक्रम फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

विविध उपक्रमांचे आयोजन
आजपासून पूर्ण महिना तंबाखूविरोधी महिना म्हणून उपक्रमांचे आयोजन इंडियन डेंटल असोसिएशनकडून केले जाणार आहे. व्याख्यानांसह वॉकींग रॅली, पथनाट्य असे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. 

तंबाखूसेवनापासून दूर राहण्याची गरज...
तंबाखूसेवन आरोग्यास सर्वाधिक अपायकारक आहे, या मुळे केवळ व्यक्तीच नाही तर कुटुंब उध्वस्त होते, त्या मुळे तंबाखूविरोधी चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे- डॉ. वैशाली कोकरे, अध्यक्षा इंडियन डेंटल असो. बारामती फलटण शाखा.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cycle rally for ani tobacco day in Baramati