esakal | बारामतीत वकील संघटनेची सायकल रॅली
sakal

बोलून बातमी शोधा

वकील संघटनेची सायकल रॅली

वकील संघटनेची सायकल रॅली

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : येथील बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटनेच्या वतीने 'महात्मा गांधी जयंती' तसेच 'आजादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमाअंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन केले गेले.

सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय विधी सेवा समितीच्या आदेशानुसार देशभरात आजादी का अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. बारामतीतील न्यायमंदीरासमोरुन सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जे.पी. दरेकर यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. भालेराव यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला गेला.

हेही वाचा: खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?'

या प्रसंगी न्यायाधिश डी.बी. बांगडे यांच्यासह बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. चंद्रकांत सोकटे उपस्थित होते. न्यायालयापासून सुरु झालेली सायकल रॅली भिगवण चौकातून हुतात्मा स्तंभास अभिवादन करुन पुढे गेली. हुतात्मा स्तंभासह नगरपालिकेतील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास न्यायाधिश व्ही.बी. कांबळे, न्यायाधिश, ए.जे. गिरहे, न्यायाधिश पी.आर. वाघडोळे यांनी पुष्पहार अर्पण केला.

वकील संघटनेचे अध्यक्ष अॅ. चंद्रकांत सोकटे, उपाध्यक्ष अँड. स्नेहा भापकर, सचिव अँड. अजित बनसोडे, अँड. गणेश शेलार व कार्यकारिणी सदस्य आणि अॅड. विजयसिंह मोरे, अॅड ज्ञानेश्वर रासकर, अॅड इनक्लाब शेख, अँड. रमेश कोकरे, अॅड़ धीरज लालबिगे, अँड. राजेंद्र, अँड. सविन आगवणे यांच्यासह अनेक वकील या प्रसंगी उपस्थित होते.

loading image
go to top