Cycle
Cyclesakal

सायकलच्या किमती वाढल्या

इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ यामुळे सगळ्याच प्रकाराच्या सायकलच्या किमती सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

स्वारगेट - इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ यामुळे सगळ्याच प्रकाराच्या सायकलच्या किमती सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याचे महत्त्व उमगलेले आहे. त्यातच हिवाळा हा व्यायामासाठी उत्तम हंगाम समजला जातो. त्यामुळे विशेषतः महिलावर्ग व लहान मुले या वर्गातून सायकलींस विशेष मागणी आहे. तसेच इलेक्ट्रिक सायकलचे फायदे अनेक असल्याने, खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सायकलला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर ई-सायकलसाठी लागणाऱ्या लिथियम आयर्न बॅटरीच्या किमतीही वाढल्याने सायकलच्या किमती वाढल्या आहेत. लिथियम हे चीन, अमेरिका येथून आयात करावे लागते, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

सायकल बनवण्यासाठी स्टील, रबर, अल्युमिनियम, प्लास्टिक यांच्या किमती वाढल्या असल्या, तरी सायकलच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण डिझेलच्या किमतीत झालेली वाढ हे आहे. डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम ट्रान्सपोर्टवर झाला आहे. तसेच स्टीलची किंमत वाढली असून, अन्य कच्च्या मालाचेही दर वाढलेले आहेत, असे सायकल व्यावसायिक दिलीप बोरा यांनी सांगितले.

Cycle
"मित्राचा वाढदिवस साजरी करायला गेला; अन् ..."

किंमत ऑक्टोबर नोव्हेंबर

साधी सायकल ५८५० ७८३५

फॅन्सी सायकल ४७४५ ६०४५

इलेक्ट्रिक सायकल २६००० २९०००

सायकलसाठी लागणारा कच्चा माल, डिझेलच्या वाढलेल्या किमती परिणामी, वाढलेला ट्रान्सपोर्ट खर्च, त्याचबरोबर लिथियम आयर्न बॅटरीच्याही किमती वाढल्याने सायकलच्या किमतीत वाढ झाली आहे.

- नीरज कुदळे, सायकल व्यावसायिक

बरेच दिवस सायकलींच्या भावात वाढ झाली नव्हती. ही वाढ अपेक्षित होती. इतर वस्तूंचे ज्या प्रमाणात भाव वाढले आहेत, त्या प्रमाणात सायकलचे भाव वाढीचे प्रमाण कमी आहे .

- राहुल राणे, सायकल व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com