"मित्राचा वाढदिवस साजरी करायला गेला; अन् ..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"मित्राचा वाढदिवस साजरी करायला गेला; अन् ..."

"मित्राचा वाढदिवस साजरी करायला गेला; अन् ..."

कोंढवा : बोपदेव घाटातील पठारवाडी तलावात बुडून एका १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा मुलगा आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अन्य मित्रांसोबत गेला होता त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: परमबीर सिंग फरार घोषित, न्यायालयाचा मोठा निर्णय

अनिश तानाजी खेडेकर (वय १५, रा. धनकवडी) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. धनकवडीतीलच मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ९ जण बोपदेव घाटात गेले होते. केक कापल्यानंतर सर्वजण बोपदेव घाटापासून जवळच असलेल्या पठारवाडी येथील तलावाजवळ गेले. मंगळवारी सायंकाळी ०५ वाजण्याच्या सुमारास फोटो काढण्यासाठी ते तलावाच्या पाण्यात उतरले होते. त्यावेळी अनिस खेडकर आणि आणखी एक जण पाण्यात बुडू लागला. सोबत असणाऱ्या इतर मुलांनी एकाला बाहेर काढले. परंतु, अनिस मात्र पाण्यात बुडाला. त्यावेळी मित्रांनी अनिशचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही.

हेही वाचा: ... तर आपलं अंगण सोडून पाकला दुसऱ्याच्या दारात 'नाचावं' लागेल!

त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारा कोंढवा अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन लाईफ रिंगच्या मदतीने अनिषचा मृतदेह मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला. यामधे कोंढवा अग्निशमन केंद्राचे वाहनचालक रविंद्र हिवरकर आणि जवान दशरथ माळवदकर, संदिप पवार, औंकार ताटे, गोविंद गित्ते यांनी ही कामगिरी केली.

loading image
go to top