कोथरूडमध्येही सायकल शेअरिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - सार्वजनिक ठिकाणी महापालिकेतर्फे राबविण्यात येणारी सायकल शेअरिंग योजना आता कोथरूडमध्येही सुरू झाली आहे. त्यासाठी ‘मोबाईक’ कंपनीच्या सायकल आता पुण्यात उपलब्ध होणार आहेत. वीस मिनिटांच्या प्रति राईडसाठी दहा, तर दरमहा ९९ रुपयांत या सायकल पुणेकरांना उपलब्ध होणार आहेत. 

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात सायकल योजना राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यांतर्गत महापालिका प्रशासनाने चार कंपन्यांशी करार केले आहेत.

 त्यांतर्गत येत्या तीन वर्षांत सुमारे चार लाख सायकली पुण्यात भाडेतत्त्वावर नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. मोबाईक कंपनीशीही महापालिकेने करार केला आहे. कोथरूडमध्ये पहिल्या टप्प्यात मोबाईकने शंभर सायकली उपलब्ध केल्या असून, वर्षभरात सुमारे २५ हजार सायकली उपलब्ध होतील, अशी माहिती कंपनीचे देशातील मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित नायर यांनी दिली.
  मोबाईक कंपनीची १६ देशांत या पूर्वी सायकल शेअरींग योजना सुरू आहे.

त्यांनी देशात ही योजना पुण्यातच प्रथम राबविली आहे. या प्रसंगी कंपनीचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन प्रमुख मार्क लीन, नायर, महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, महापालिकेच्या सायकल योजना विभागातील अधीक्षक अभियंता नरेंद्र साळुंखे या प्रसंगी उपस्थित होते. या योजनेंतर्गत सायकल वापरण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम भरावी लागणार नाही. तसेच, ९९ रुपयांच्या मासिक पासच्या माध्यमातून अमर्यादित सायकल वापरता येणार आहे.

डिजिटल वॉलेटद्वारे शुल्क भरण्याची सोय
मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना विविध डिजिटल वॉलेटद्वारे शुल्क भरता येऊ शकेल. मोबाईक ॲप डाउनलोड करून सायकल नागरिक शोधू शकतात. सायकलवरील क्‍युआर कोड स्कॅन करत सायकल राईड करता येऊ शकेल. 

Web Title: cycle sharing in kothrud