

भुवनेश्वर, ता. २६ (पीटीआय) ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णव’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत असून उद्या (ता. २७) त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, बुधवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १४० कि.मी.पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशासह सुमारे दहा राज्यांत पावसाची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशात जवळपास सहा लाख जण सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या तयारीत असून किनारी जिल्ह्यांत अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तमिळनाडूत गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू असून अरणीमधील भास्करनगरमध्ये पाणी शिरल्याने अनेकजण आपल्या घरांत अडकून पडले. कोडाइकनालमध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. राज्यातील तिरूवारुर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.
चक्रीवादळामुळे मध्य प्रदेशातही मंगळवारपासून पावसाची शक्यता आहे. पन्ना,सतना,रीवा आदी जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
ओडिशात ६० पथके तैनात
ओडिशावरही ‘अर्णव’ चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता असून बचावकार्यासाठी ६० पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सहा जिल्ह्यांत २८ व २९ ऑक्टोबर रोजी शाळा-महाविद्यालये बंद राहतील. ओडिशा सरकारनेही मच्छीमारीवर बंदी घातली असून सहा जिल्ह्यांतील धरणे, धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. चक्रीवादळाचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता असलेल्या दक्षिण ओडिशातील गंजम, गजपती, रयागाडा, मलकानगिरी,कोरापूत आणि नवरंगपूर या जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. ‘एनडीआरएफसह पोलिस, अग्निशमन दल संभाव्य आपत्तीसाठी सज्ज झाले आहे.
हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशचा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असली तरी ओडिशा सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली जात आहे. आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये.
- सुरेश पुजारी, आपत्ती व्यवस्थापन मंत्री,ओडिशा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.