esakal | शिवभक्तांनो, राजगडावरील देवीच्या मंदिराचे पहा काय झाले, तोरण्यावरही...
sakal

बोलून बातमी शोधा

rajgadh

किल्ले तोरणा व राजगड या किल्ल्यांवरील वास्तूंनाही नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका  बसला आहे. किल्ल्यावर वीज परवठा करणारे खांब कोसळले आहेत. शिवप्रेमींनी याबाबत तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

शिवभक्तांनो, राजगडावरील देवीच्या मंदिराचे पहा काय झाले, तोरण्यावरही...

sakal_logo
By
मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : किल्ले तोरणा व राजगड या किल्ल्यांवरील वास्तूंनाही नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका  बसला आहे. किल्ल्यावर वीज परवठा करणारे खांब कोसळले आहेत. शिवप्रेमींनी याबाबत तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

दिलासादायक, जुन्नर तालुक्यातील ही पाच गावे झाली कोरोनामुक्त


राजगड किल्ला स्वराज्याची  पहिली राजधानी आहे. या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा सत्तावीस वर्ष राज्यकारभार चालवला. या किल्लावरील पद्मावती मंदिरावरील पत्रे उडाले असून, किल्लावऱ वीज पुरवठा करणारे खांब कोसळले आहेत. त्यामुळे येथील वीज पुरवठा बंद झाला आहे. राजगड किल्यावरील पद्मावती माचीवर असलेल्या पद्मावती देवीचे शिवकालीन मंदिर असून, कोणत्याही मोहिमेला जाताना व मोहिमेवरून येताना शिवाजी महाराज या देवीचे आशीर्वाद घेत, तर आजही किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. 

मंचरला आठवडे बाजार भऱणार तोही दोन दिवस

या शिवकालीन देवीच्या मंदिराचे काम जुने असून, कोरीव लाकडात केले आहेत. यामध्ये तुळया, उभे खांब, वासे, चौकट हे संपूर्ण लाकडात असुन छतावर पत्रे टाकण्यात आला होते. तेच पत्रे उडाल्याने हे मंदिर उघडे पडले आहे. सध्या वेल्हे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वी या मंदिरावर पत्रे टाकणे गरजेचे आहे. अन्यथा या शिवकालीन मंदिरावरील जुनी लाकडे खराब होऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

किल्ले तोरण्यावरील दारुगोळा कोठारा या वास्तूचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र, यावरील पत्रे उडाले आहेत. याबाबत पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राजगड किल्लयावरील पद्मावती मंदिरावर काम तात्काळ सुरु केले जाणार असून, या ठिकाणी पत्रे मारले जाणार आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते म्हणाले की, किल्ल्यावरील पाहणी करुन विद्युत पुरवठा तत्काळ सुरू केला जाईल.

बारामतीतील कोऱ्हाळे येथील ज्येष्टाचा कोरोनाने मृत्यू


दरम्यान, शिवशंभू प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम यांनी या मंदिरावर लागणारे पत्रे  प्रतिष्ठाणच्या वतीने देणार असल्याची माहिती दिली असून, याबाबत 
कोणतीही मदत करण्यास प्रतिष्ठाण तयार आहे, परंतु हे काम पाऊस सक्रिय होण्याआधी करावे, ही त्यांनी विनंती पुरातत्व खात्याकडे केली आहे. 

loading image
go to top