Pune News : दिव्यांगाध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी सायक्लोथॉन ; स्टीफन वूरमन्स यांचा सहभाग

अपंगत्वामुळे जीवन जगण्यात काही अडथळे येत असले तरी तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक बाबी साध्य करू शकता, असा संदेश देण्यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि विविध रोटरी क्लब यांच्यावतीने सायक्लोथॉन हा सायकलिंगचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
pune
punesakal

पुणे : अपंगत्वामुळे जीवन जगण्यात काही अडथळे येत असले तरी तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक बाबी साध्य करू शकता, असा संदेश देण्यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि विविध रोटरी क्लब यांच्यावतीने सायक्लोथॉन हा सायकलिंगचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सायक्लोथॉनचे वैशिष्ट म्हणजे यात जर्मनीवरून आलेले स्टीफन वूरमन्स सहभागी झाले आहे.

दुचाकीच्या अपघातात कमरेखालील शरीर निकामी झालेले स्टीफन हाताने पॅडल मारत ही सायक्लोथॉन पूर्ण करणार आहेत. वार्इवरून सुरू झालेली ही सायक्लोथॉन नाशिकमार्गे मुंबर्इत संपणार आहे. २३ ते २७ जानेवारी दरम्यान ५१० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला जाणार आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी वार्इवरून निघालेले स्टीफन दुपारी पुण्यात पोचले. त्यानंतर त्यांनी बाल कल्याणमधील मुलांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांनी दिव्यांग सैनिकांची काळजी घेणाऱ्या क्लीन मेरी टेक्निकल इंस्टीट्यूटला भेट दिली. बुधवारी (ता. २४) पुढील प्रवास सुरू करणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लबकडून देण्यात आली.

pune
Pune News : बालवाडीतील चिमुकल्याचा थरार ; स्केटिंगमध्ये चौफुल्याच्या ऋत्विक कुंभारचा विक्रम

हाताने पॅडल मारतात स्टीफन हे साधारण प्रत्येक तासाला २० किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. जीवनातील कठीण आव्हानांवर मात कशी करावी, याचे चांगले उदाहरण असलेले स्टीफन या प्रवासातून अनेकांना प्रेरणादायी ठरतील. त्यामुळे सायक्लोथॉन ही केवळ शर्यत नसून मानवी धैर्याचा पुरावा देणारा प्रवास आहे, असे रोटरी क्लबचे नितीन जोशी यांनी सांगितले.

मला सायकलिंगची आवड आहे. त्या आवडीला रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने साथ दिली. या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वार्इतून ९६ किलोमीटरचा प्रवास करून मी पुण्यात आलो आहे.

स्टीफन वूरमन्स, सायकलस्वार

खडकी : क्लीन मेरी टेक्निकल इंस्टीट्यूटमधील पदाधिकाऱ्यांनी स्टीफन वूरमन्स यांचे स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com