
राज्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचा गणेशोत्सव देखील उत्साहात साजरा होत आहे. मंडळाचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे. मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी गणेशोत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा मात्र गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.