‘दगडूशेठ’चे बाप्पा राजराजेश्‍वर मंदिरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात तमिळनाडू, तंजावर येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात येणार आहे. 

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात तमिळनाडू, तंजावर येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात येणार आहे. 

अकराव्या शतकाच्या सुरवातीला उभारलेल्या या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. या मंदिराची प्रतिकृती भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे. या वर्षीच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, दत्तोपंत केदारी, कुमार वांबुरे, उत्तमराव गावडे, सुवर्णयुग बॅंकेचे अध्यक्ष राजाभाऊ  सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. 

गोडसे म्हणाले, ‘‘राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत. या मंदिराला तमीळ भाषेत बृहदेश्‍वर मंदिर किंवा बृहदीश्‍वर मंदिर असे म्हटले जाते. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मिती केल्याने राजराजेश्‍वर मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. हे मंदिर १३ मजली व ६६ मीटर उंचीचे आहे. वास्तुकला, पाषाण आणि ताम्र शिल्पांकन, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषण या कलांचे भांडार असलेल्या या मंदिरात संस्कृत आणि तमीळ पुरालेखांचा अनोखा संगम आहे. 

खटावकर म्हणाले, ‘‘श्री राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून उंची ९० फूट आहे. 

Web Title: dagdusheth halwai ganpati rajrajeshwar temple decoration