भिगवणकरांनी अनुभवला दहीहंडीचा उत्साह 

प्रा. प्रशांत चवरे
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

इंदापुर येथील आव्हान प्रतिष्ठान गोविंदांनी चित्तथरारक पाच थर लावुन ही दहीहंडी फोडली. मंडळास ३१ हजार रुपये व चषक देण्यात आला. कुंडलिक बंडगर, तेजस देवकाते, प्रकाश शिंगाडे, योगेश बंडगर आदींनी नियोजन केले.

भिगवण - ढोल ताशा व संगिताच्या तालावर थिरकणारी तरुणाई, नेत्यांची मांदियाळी व सिने तारकांच्या उपस्थिती अशा वातावरणात येथील दहिहंडी उत्सव जल्लोशात साजरा करण्यात आला. येथील चार दहिहंडी उत्सव मंडळानी एकाच दिवशी दहिहंडीचे आयोजन केल्यामुळे येथील वातावरण गोविंदामय झाले होते.

येथील समृध्दी क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहिहंडी उत्सवास दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, नगरसेवक शितल शिंदे उपस्थित होते. इंदापुर येथील आव्हान प्रतिष्ठान गोविंदांनी चित्तथरारक पाच थर लावुन ही दहीहंडी फोडली. मंडळास ३१ हजार रुपये व चषक देण्यात आला. कुंडलिक बंडगर, तेजस देवकाते, प्रकाश शिंगाडे, योगेश बंडगर आदींनी नियोजन केले.

येथील सचिनभैय्या खडके मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवासाठी सिनेअभिनेत्री तेजा देवकर व अदिती द्रवीड, पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, माजी सभापती रमेश जाधव, अशोक वणवे,  महेश देवकाते, दिनेश मारणे उपस्थित होते. बारामती येथील महाबली दहिहंडी मंडळाने ही दहीहंडी फोडली. मंडळास रोख बक्षीस व चषक प्रदान करण्यात आला.  सचिन खडके, निलेश गायकवाड, सौरभ जमदाडे, सागर कांबळे, दादा मारकड यांनी नियोजन केले.

येथील समता प्रतिष्ठानच्या वतीने दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, सभापती करणसिंह घोलप, माजी सभापती रमेश जाधव, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, दिपक जाधव, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे उपस्थित होते. बारामती येथील महाबली दहिहंडी मंडळाने ही हंडी फोडली. मंडळास ५५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. प्रेम भोसले, किरण कांबळे, अमोल भोसले, अल्ताफ शेख, रमेश कदम यांनी नियोजन केले.

येथील अमरबौध्द युवक संघटनेच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार दत्तात्रय भरणे, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार, संदिपान तडवळे, रामहारी चोपडे, जयदीप जाधव उपस्थित होते. इंदापुर येथील आव्हान प्रतिष्ठानने ही दहीहंडी फोडली. मंडळास ५१ हजार व चषक प्रदान करण्यात आला. अमोल कांबळे, रोहित शेलार, संघर्ष धेंडे, सुनिल शेलार यांनी नियोजन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi at bhigwan pune