पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागल्यामुळे पीएमपीने शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून १ हजार बस मार्गावर सोडण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आता सुमारे ६० टक्के बस रस्त्यावर आल्या आहेत. प्रवासीसंख्येचा ३ लाखांचा टप्पा पार झाला असून, रोजचे उत्पन्नही सुमारे ४४ लाख रुपयांवर पोचले आहे.

पुणे - प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागल्यामुळे पीएमपीने शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून १ हजार बस मार्गावर सोडण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आता सुमारे ६० टक्के बस रस्त्यावर आल्या आहेत. प्रवासीसंख्येचा ३ लाखांचा टप्पा पार झाला असून, रोजचे उत्पन्नही सुमारे ४४ लाख रुपयांवर पोचले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन शिथिल झाल्यावर ३ सप्टेंबरपासून पीएमपीची प्रवासी वाहतूक सुरू झाली. सुरुवातीला २५ टक्के बसच मार्गावर होत्या. परिणामी सुमारे ५५० बसद्वारे दोन्ही शहरांत वाहतूक सुरू होती. परंतु, गेल्या महिन्यात प्रवाशांची संख्या वाढू लागली. बसमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी घेण्याची सूचना प्रशासनाने बसचालक आणि वाहकांना केली आहे. त्यामुळे बसमध्ये गर्दी होऊ लागल्याने जादा बस मार्गावर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणात संशयितांवर आरोप निश्‍चिती 

दिवाळीमुळे उपनगरे तसेच दोन्ही महापालिकांच्या हद्दीबाहेरून म्हणजे राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, घोटावडे, पौड, पिरंगुट, लोणी काळभोर, आळंदी, देहू आदी ठिकाणांवरून खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने शहरात येत आहेत. त्यामुळे उपनगरांतील बससेवेला वाढता प्रतिसाद आहे. जादा बस सोडाव्या लागत असल्या तरी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक बस दिवसातून किमान दोन वेळा सॅनिटाईज करण्याच्या सर्व आगारांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची तसेच चालक-वाहकांची सुरक्षितता जोपासण्यावर भर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीएमपीच्या एरवी १६५० बस मार्गांवर धावत होत्या. सध्या सुमारे १ हजार बस मार्गावर सोडण्यात येत आहेत.

पुढच्या वर्षीपासून मराठीमध्ये 'लाॅ'

माजी सैनिकांच्या बस दाखल 
माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या बचत गटांनी स्थापन केलेल्या ‘विश्‍वयोद्धा शेतकरी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या ४४ बस भाडेतत्त्वावर पीएमपीमध्ये सोमवारी दाखल झाल्या. त्यातील ११ बस मार्गांवर सोडण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. या प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष सुरेश गोडसे आणि समन्वयक कर्नल सी. व्ही. जाधव उपस्थित होते. या बस १२ मीटर लांबीच्या असून, सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गांवर पहिल्या टप्प्यात या बस सोडण्यात येत आहेत. 

शहराच्या मध्यभागातील ९ मार्ग आणि उपनगरांतील ४६ मार्गांवर पीएमपीने सुरू केलेल्या अटल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासीसंख्याही वाढत आहे.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily 60 percent passenger journey of PMP buses