esakal | रोजच्या इंधन दरवाढीतून पुणेकरांना जरासा दिलासा!
sakal

बोलून बातमी शोधा

The daily fuel price hike stop risen only twice in the last 13 days

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंधनाचे दर काहीसे कमी झाले होते. त्यानंतर आक्टोंबरअखेरपर्यंत दर आणखी स्थिरावतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. त्या काळात दर दोन ते तीन रुपयांनी कमी झाले. मात्र त्यानंतर पुन्हा सातत्याने दरवाढ सुरूच आहे.

रोजच्या इंधन दरवाढीतून पुणेकरांना जरासा दिलासा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : इंधन दरवाढीला वैतागलेल्या वाहनचालकांना अद्याप दर कपातीचा दिलासा मिळालेला नाही. मात्र दरवाढीचे शॉक बसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 13 दिवसांत केवळ दोनदाच वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. अनलॉक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच असे झाले आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेल ९० रुपये प्रतिलिटरच्या घरात गेले आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. तर इंधनाच्या वाढलेल्या किमतीमुळे महागार्इ देखील वाढत आहे. या सर्वांचा फटका सर्वसामान्यांना सातत्याने बसत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ मागे घ्यावी म्हणून आता जोरदार आंदोलने सुरू झाली आहेत. या सर्वात आता दरवाढ थांबल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार की काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा - ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंधनाचे दर काहीसे कमी झाले होते. त्यानंतर आक्टोंबरअखेरपर्यंत दर आणखी स्थिरावतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. त्या काळात दर दोन ते तीन रुपयांनी कमी झाले. मात्र त्यानंतर पुन्हा सातत्याने दरवाढ सुरूच आहे.

इंधनाचे दर (प्रतिलिटर)
२० फेब्रुवारी
पेट्रोल - ९६.६२
पॉवर पेट्रोल - १००.३१
डिझेल - ८६.३६
सीएनजी - ५५.५० (प्रतिकिलो)

२२ फेब्रुवारी
पेट्रोल - ९६.९६
पॉवर पेट्रोल - १००.६४
डिझेल ८६.७२
सीएनजी - ५५.५० (प्रतिकिलो)

२७ फेब्रुवारी
पेट्रोल - ९७.१९
पॉवर पेट्रोल - १००.८७
डिझेल - ८६.८८
सीएनजी - ५५.५० (प्रतिकिलो)


सरकारने आधी इंधनाचे दर वाढवून नागरिकांचे फिरणे मुश्कील केले आहे. त्यात आता गॅसचे दर वाढवून सर्वासामान्याचे जगणे मुश्कील करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस पूरता उध्वस्थ होऊन लागला आहे. मात्र आपल्या उद्योगपती मित्रांचे खिसे कसे भरता येतील याची पूर्ण तजवीज सरकार अगदी पद्धतशीरपणे करीत आहे.
- आनंद सोनावणे, वाहनधारक


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या बॅरलचे दर आधी ६७ डॉलर होते. सध्या ते ६० डॉलर झाले आहेत. आखती देशात दर कमी-जास्त झाले की त्याचा १५ दिवसांना परिमाण भारतात जाणवतो. येत्या काही दिवसांत बॅरलचे दर कमी झाले तर देशातील इंधनाचे दर देखील आणखी कमी होणार आहे.
अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

loading image
go to top