दक्षता समितीमुळे महिला सुखरूप घरी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बारामती - बारामती-इंदापूर रस्त्यालगत निपचित पडलेल्या महिलेला पाहून काहींना ती वेडसर असावी, असा संशय आला. काहींना तिला फिटचा त्रास असावा, असे वाटले. मात्र, येथील महिला दक्षता समितीच्या तत्परतेमुळे त्या महिलेला वेळेत उपचार मिळाले. शिवाय, तिचे घर शोधून तिला तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याकडून व्यवस्थित वागविण्याची हमी घेण्यात आली. 

बारामतीत मागील १५ दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एक महिला बेशुद्ध पडली असून, तिच्या तोंडापर्यंत रक्त वाहिल्याची व तिच्याभोवती गर्दी झाल्याची माहिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने ट्रस्टमधील सचिन खलाटे यांना मदतीसाठी पाठविले. खलाटे यांनी महिला दक्षता समितीच्या अंजू वाघमारे व आशा नवले, प्रशांत बोबडे यांना तेथे बोलावले. अंजू वाघमारे यांनी त्यांच्या खासगी वाहनातून त्या महिलेस सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात आणून उपचाराची विनंती केली. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात केली. दोन दिवसांनंतर त्या महिलेस पुण्याला मनोरुग्णालयात पाठविण्याचा सल्ला पोलिस व डॉक्‍टरांनी दिला. मात्र, ती महिला वेडसर नसल्याचे सांगत वाघमारे यांनी तिच्याकडून जुजबी माहिती घेतली. तेव्हा ती फलटण येथील सस्तेवाडीची असल्याचे समजले. अंजू वाघमारे सस्तेवाडी येथे गेल्या.

तोपर्यंत या महिलेचा पती पत्नीचा शोध घेत होता. काही दिवसांपूर्वी चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी अचानक निघून गेली, अशी माहिती त्याने वाघमारे यांना दिली. वाघमारे यांनी त्या महिलेस घेऊन फलटण शहर पोलिस ठाणे गाठले. अधिकाऱ्यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्याची रीतसर पोलिस ठाण्यात नोंद करून तिच्या पतीला बोलाविण्याची विनंती केली.

त्यानंतर पोलिसांनी पतीला बोलावून केलेली चौकशी व प्रबोधनातून पतीने यापुढील काळात तिला कसलाही त्रास होणार नाही, याची लेखी हमी दिली. पत्नीला सुखरूप घरापर्यंत पोचविल्याबद्दल अंजू वाघमारे, आशा नवले व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबडे यांचे त्याने आभार मानले. 

Web Title: dakshata committtee women secure