esakal | शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; मूग - मटकीच्या शेंगांना फुटले कोंब
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to farmers due to sprouting Legumes of Green gram and moth beans

कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली, चांडोह, कवठे येमाई, मिडगुलवाडी  या परीसरात कधी रिमझीम पाऊस तर कधी जोरदार सरी यामुळे विविध पिकांवर रोंगाचा प्रार्दुभाव झाल्याने खरीपाची पिके संकटात आली आहेत. खरीप हंगामातील लवकर येणाऱ्या, नगदी समजल्या जाणाऱ्या मूग व मटकी उभ्या पिकाची नासाडी होत आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; मूग - मटकीच्या शेंगांना फुटले कोंब

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी(पुणे) : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी देखील रिमझिम पडणाऱ्या पावसाने बहरात असलेल्या मूग व मटकीच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही शेतकऱ्यांनी मूग काढून आडोसा करत शेंगा सुकायला टाकल्या आहेत. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली, चांडोह, कवठे येमाई, मिडगुलवाडी या परिसरात कधी रिमझिम पाऊस तर, कधी जोरदार सरी यामुळे विविध पिकांवर रोंगाचा प्रार्दुभाव झाल्याने खरीपाची पिके संकटात आली आहेत. खरीप हंगामातील लवकर येणाऱ्या, नगदी समजल्या जाणाऱ्या मूग व मटकी उभ्या पिकाची नासाडी होत आहे. मूगाच्या पिकावर रोग आला असून पाने व शेंगा पिवळ्या झाल्या आहेत. या रोगाचा अटकाव देखील करता येत नसल्याचे शेतकरी सांगतायत. मटकी पिकाला काही शेतात झाडावरील शेंगाना कोंब फुटले आहेत. या वर्षी या परीसरात अधूनमधून चांगल्या सरी कोसळल्या होत्या. त्यातून खरीप हंगामातील पिके जोमदार येतील अशी आशा होती. मात्र रोग व अधुनमधून कोसळणाऱ्या सरी यामुळे हातातोंडाशी येणारे हि पिके धोक्यात आली आहेत. 

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

ढगाळ वातावरण व अधुन मधून पडणारा रिमझीम पाऊस यामुळे पानावर व शेंगावर परीणाम झाला आहे. वातावरणातील आद्रता यामुळे मटकी च्या शेंगा मधून कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे हाताशी आलेली मटकी सोडून द्यावी लागेल. 
- दत्तात्रेय थोपटे, शेतकरी, मोराची चिंचोली ( ता. शिरूर ) 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

loading image
go to top