
सासवड : पावसाचा जोर थोडा कमी झाला तरी काळदरी व घेरा पुरंदर भागात अजूनही मधून मधून सरी पडतच आहेत. त्यामुळे वाहणारे नाले, अोढे व लगतच्या भातखाचरातील भात पिक पाण्याखाली गेले. काही ठिकाणी नुकत्याच लागणी झालेला भातही वाहून गेला. त्यातून भाताचे 25 ते 30 टक्के नुकसान झाले. मात्र घेवडा पिकाचे 70 ते 80 टक्के नुकसान झाले आहे.
काळदरीचे उपसरपंच अंकुश परखंडे म्हणाले, एक तर आॅगस्टच्या पहील्या आठवड्यापर्यंत पाऊस नसल्याने काळदरी खोऱयात 70 टक्के भात लागणी रखडल्या होत्या. मात्र पाऊस सुरु झाला व चित्र पालटले. दोन - तीन दिवसात भात लागणी शंभर टक्के झाल्या. मात्र लागणीनंतर सततच पाऊस आणि सुर्यदर्शनच नसल्याने.. तलाव, बांध, बंधारे भरुन नाले, अोढे पात्र सोडून पूर स्थितीत वाहू लागले.
त्यातून नाल्याच्या व अोढाच्या कडेची भातखाचरे तुडुंब होऊन तेथूनही प्रवाह वाहू लागला. त्यातून काही ठिकाणी रोपे वाहून गेली. अोढ्यालगतचे भात पिक सतत आठवड्यापेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहीले. आता पावसाचा जोर थोडा कमी झाला तरी काळदरी व घेरा पुरंदर भागात अजूनही मधून मधून सरी पडून.. वाहणारे नाले, अोढे व लगतच्या भातखाचरातील काही भात पिक पाण्याखालीच आहे. बाकी पिकातील पाणी थोडे अोसरले आहे. मात्र लागणी झालेला भात वाहून गेला हे नुकसानच असून पाण्यातील पिक कुजून त्याची उत्पादकता कमी होईल. हे सारे नुकसान 25 ते 30 टक्के आहे.
भिवडी व लगतच्या गावशिवारात घेवडा पिक संपले..पुरंदर तालुक्यात अधिक पाऊस झालेल्या भागात खरीपातील घेवडा पिकाचे 70 ते 80 टक्के, भूईमुग 50 टक्के, वाटाणा (मटार) चे 30 टक्के नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजीआबा गायकवाड म्हणाले., सासवडपासून इकडे भिवडी, नारायणपूर, पोखर, कोडीत परिसरात तर घेवड्याचे जादा पावसाने 90 ते 100 टक्के नुकसान झाले आहे. वाटाणी, घेवडा, भूइमुग, भात यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कृषी, महसूलकडून त्वरीत नुकसानीचे पंचनामे व्हावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.