मावळातील धरणे ‘ओव्हरफ्लो’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

वडगाव मावळ - मावळात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना, वडिवळे व आंद्रा ही महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यापासून आतापर्यंत पावसाने सातत्य कायम राखले आहे. गेल्या काही दिवसांपासून, तर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही पुलांवरून पाणी गेल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्‍याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या पवना धरणात २७२.१२ दशलक्ष घनमीटर एकूण तर २४०.९७ दशलक्ष घनमीटर (८.५१ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात रविवारी सकाळपर्यंत ५३ मिलिमीटर (एकूण २ हजार ६४४ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली होती. धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून सध्या २ हजार २०८ क्‍युसेक याप्रमाणे विसर्ग सुरू आहे. नाणे मावळातील वडिवळे धरणात ४०.८७ दशलक्ष घनमीटर एकूण, तर ३०.३९ दशलक्ष घनमीटर (१.०७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात दिवसभरात ७८ मिलीमीटर (एकूण ३ हजार मिलिमीटर) पाऊस झाला आहे. धरणातून सध्या एक हजार ३७६ क्‍युसेक याप्रमाणे विसर्ग सुरू आहे. आंदर मावळातील आंद्रा धरणात ८३.३० दशलक्ष घनमीटर एकूण, तर ८२.७५ दशलक्ष घनमीटर (२.८२ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात दिवसभरात १५ मिलिमीटर (एकूण ८३८ मिलिमीटर) पाऊस झाला. धरणातून सध्या ५१६ क्‍युसेकप्रमाणे विसर्ग सुरू आहे. पूर्व पवन मावळातील कासारसाई धरणात १६.९२ दशलक्ष घनमीटर एकूण, तर १५.६७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त (०.५५ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. धरण ९७ टक्के भरले असून, परिसरात आतापर्यंत ६६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: dams Overflow in maval