बच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे. 

पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे. 

स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी शाळा व मॉल्समध्ये ऑडिशन्स होणार आहेत. ऑडिशनमधून निवडण्यात आलेले स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. पारितोषिक वितरण २५ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी होईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. वयोगटानुसार नृत्य स्पर्धा ‘अ’ ते ‘क’ या गटात विभागली आहे. ‘अ’ गटात बालवाडी ते दुसरी, ‘ब’ गटात चौथी ते सहावी, ‘क’ गटात सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ‘अ’ गटात बालवाडी ते पहिली व ‘ब’ गटात दुसरी ते पाचवी अशी विभागणी केली आहे. 

‘आयटम साँग’ ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. ऑडिशन व अंतिम फेरीसाठी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर करायचे आहे. 

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक अभिरुची मल्टिप्लेक्‍स मॉल व बक्षिसांचे प्रायोजक न्यू एरा ॲकॅडमी- संस्कृती नॅशनल स्कूल हे आहेत. नृत्य स्पर्धेतील बेस्ट सादरीकरणासाठी एका स्पर्धकाला सायकल भेट मिळणार आहे. सायकल व विविध भेटवस्तूंचे प्रायोजक चिजीयानो पिझ्झा हे आहेत.

ऑडिशनची ठिकाणे 
(वेळ - सायंकाळी ५ ते रात्री ८)
 नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड - शनिवार (ता. १५)
 सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी - रविवार (ता. १६)
 क्‍लारा ग्लोबल स्कूल, घोरपडी रोड, हडपसर - शनिवार (ता. २२)
 अभिरुची मल्टिप्लेक्‍स मॉल, सिंहगड रोड - रविवार (ता. २३)

स्पर्धेसाठी शुल्क
 सोलो नृत्य - १५० रुपये
 फॅन्सी ड्रेस स्पर्धा - १५० रुपये
 संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

Web Title: Dance Fancy Dress Competition