esakal | यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Dandiya

शहरांमध्ये मोठ्या मैदानात रास-दांडियाचे कार्यक्रम, आयोजित केले जातात, त्यात हजारो तरुण-तरुणी, नागरिक सहभागी होतात. यात पुणे देखील मागे नाही.

यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदा गणेशोत्सव अगदीच साध्या‌ पद्धतीने साजरा झाला... आता‌ नवरात्रौ‌ उत्सव, रास दांडियाचे काय?... तर हा देखील उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. तसेच रास-दांडिया‌ देखील या वर्षी खेळला जाणार नाही. 

येत्या‌ 17 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. महाराष्ट्रात‌ही या उत्सवाला महत्त्व आहे. या काळात अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात गर्दी होते. तसेच रास-दांडिया खेळण्याची प्रथा आहे. शहरांमध्ये मोठ्या मैदानात रास-दांडियाचे कार्यक्रम, आयोजित केले जातात, त्यात हजारो तरुण-तरुणी, नागरिक सहभागी होतात. यात पुणे देखील मागे नाही. महावीर जैन विद्यालय असो की म्हात्रे पुलानजीक असलेल्या लॉन्स असो, अनेक ठिकाणी नवरात्रीत रास-गरबा दांडिया खेळला जातो. गुजराती, मारवाडी समाजासह महाराष्ट्रीय समाजही यात‌ मोठ्या संख्येने असतो.

Breaking : पुण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; ६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

पुण्यात‌ कोरोनाचा कहर पाहता‌‌‌‌ यावर्षी नवरात्रीचे धार्मिक कार्यक्रम घरगुती पद्धतीने होतील. सार्वजनिक कार्यक्रमांवर मात्र मर्यादा येणार आहे. राज्य सरकार किंवा महापालिका आणि जिल्हा प्रशासन या कार्यक्रमांना परवानगी देणार नाही, अशी उत्सव आयोजकांचे म्हणणे आहे. तसेच यावर्षी दांडिया वगळता नवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी देखील त्यांनी केली आहे.

विवियन ग्रुपचे संस्थापक रोहन शहा म्हणाले, "म्हात्रे ब्रिज, गंगाधाम चौकाजवळील लॉन्समध्ये आम्ही दरवर्षी दांडिया आयोजित करतो. यावर्षी कोरोनामुळे आम्ही हे कार्यक्रम रद्द करीत आहोत. यंदा लॉकडाऊनमुळे व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे प्रायोजकत्व मिळणेही कठीण होईल, तसेच कोरोनाचा प्रसारही वाढतो आहे. त्यामुुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे."

ड्युटीच्या कारणावरून महिला पोलिसांमध्ये जुंपली; मुख्यालयातच 'फ्री स्टाईल' हाणामारी​

पुणे लोकमान्य फेस्टिव्हल नावाने दरवर्षी नवरात्री उत्सव करतो, पण दांडियाचे कार्यक्रम यंदा करणार नाही. देवीची दैनंदिन आरती आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ऑनलाइन करू. तसेच नऊ दिवस आरोग्याबाबत जनजागृती करणार आहोत.
- नरेश मित्तल (संयोजक, पुणे लोकमान्य फेस्टिव्हल)

दांडिया खेळताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे.‌ कारण असंख्य लोक त्यासाठी एकत्र येतात. कोरोनाचा वाढत्या प्रसारामुळे यंदा आम्ही जैन होस्टेलच्या मैदानात दांडिया होणार नाही. अन्य आयोजकांनी देखील त्याचे आयोजन करू नये. कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करावी.
- युवराज शहा (सचिव, महावीर जैन विद्यालय)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)