मुंबई व पुणेकरांमुळे पुरंदर तालुक्याला धाकधूक

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 29 मे 2020

पुण्यात नित्यपणे जाणारे- येणारे आणि मुंबईवरून मुळगावी आलेले हजारो लोक पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांची धाकधूक ठरली आहे.

सासवड (पुणे) : कोरोनामुक्त पुरंदर तालुक्यात अखेर मुंबई आणि पुण्यातून कोरोना आला. आतापर्यंत आढळलेल्या एकुण पाच रुग्णांपैकी  पुणे कनेक्शनधून तीन; तर मुंबई कनेक्शनमधील दोन आहेत. त्यामुळे पुण्यात नित्यपणे जाणारे- येणारे आणि मुंबईवरून मुळगावी आलेले हजारो लोक पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांची धाकधूक ठरली आहे.

शिरूर शहरावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार

लाॅकडाउन असला तरी बरीच बंधने शिथिल झाली. त्यामुळे नोकरदार पुण्यात जाऊ व येऊ लागले. अशा मंडळींनी कामावरून आल्यावर होम क्वारंटाइन व्हायचे असते, पण थोडा अपवाद वगळता बाकी शेकडो लोक नियम पाळत नाहीत.  त्यांना आवरण्यासाठी दवंडी देऊनही उपयोग होईना. त्यामुळे पुणे कनेक्शनधून तीन रुग्ण व शेकडो लोक क्वारंटाइन आहेत. मुंबईकर तर इतके आलेत आणि रोज शेकडो येतच आहेत. त्यांच्यातून दोन पाॅझीटिव्ह निघाले व अनेकांना कोविड केअर सेंटरमध्ये जावे लागले. त्याहून अधिक क्वारंटाइन आहेत.

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

वीरचे सात, सुपे नऊ, कोडीत येथे पाच व सासवडला सात, असे कोविड केअर सेंटरला आहेत. त्यातील काहींचे नमुने आज पाठविले; तर काहींचे उद्या पाठविणार असल्याचे तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी आज स्पष्ट केले. तर याप्रकरणी होम क्वारंटाइन सुमारे दोनशेहून अधिक आहेत. दरम्यान बाहेरगावाहून आलेले तर शाळांमधील क्वारंटाइन हजारो आहेत. त्यातून प्रत्येक गावात धाकधूक आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger to Purandar taluka due to Mumbai and Punekar