‘ससून’मधील होर्डिंग धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - आपण शहरात अनेक होर्डिंग बघत असतो. काही होर्डिंग भलीमोठी असतात, तर काही आकर्षक असतात. अधिकृत-अनधिकृत होर्डिंगबद्दलही आपण बोलतो. पण, या सगळ्यांपेक्षा वेगळे होर्डिंग ससून रुग्णालयाच्या आवारात दिसून येते. एकाच होर्डिंगला दोन-दोन बॅनर लावलेले आहेत. जणू ते एकमेकांशी स्पर्धा करीत झळकत आहेत. इतकेच नाही, तर ते होर्डिंग मागून वाकलेदेखील आहे. कोणत्याही क्षणी ते खाली पडेल, अशी भीती आता येथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून आणि सुरक्षारक्षकांकडून व्यक्त होते आहे. 

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात उभारलेले भलेमोठे होर्डिंग कोसळण्याची घटना अद्यापही ताजी आहे. असे असताना ससून रुग्णालयातील या धोकादायक होर्डिंगकडे रुग्णालयात प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. या एका होर्डिंगला दोन-दोन बॅनर लावल्याचेही येथे दिसून आले आहे. होर्डिंग तारेने बांधलेले असून, काही ठिकाणी ताराही तुटलेल्या आहेत. त्यामुळे वाऱ्याने हे बॅनर हलत असतात. ते खाली पडण्याचा धोका आहे.

याबाबत ससून रुग्णालयातील रुग्णाचे नातेवाईक कुणाल नायडू म्हणाले, ‘‘रुग्णालयातील हे होर्डिंग गंजलेल्या अवस्थेत आहे. त्याबाबत सुरक्षारक्षकांनाही सांगण्यात आले. कोणत्याही क्षणी हे तुटून खाली पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.’’

होर्डिंग धोकादायक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांना आम्ही बसू देत नाही, असे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

Web Title: Dangerous Hording in Sasoon Hospital