जुन्नर नगर पालिकेकडून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा : नागरिकांची तक्रार

दत्ता म्हसकर
सोमवार, 25 जून 2018

जुन्नर - गेले काही दिवसांपासून जुन्नर नगर पालिकेकडून शहरात मातीमिश्रित गढुळ व शेवाळ युक्त पाणी पुरवठा होत असून तो देखील कमी दाबाने अत्यल्प वेळ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

जुन्नर - गेले काही दिवसांपासून जुन्नर नगर पालिकेकडून शहरात मातीमिश्रित गढुळ व शेवाळ युक्त पाणी पुरवठा होत असून तो देखील कमी दाबाने अत्यल्प वेळ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हे पाणी वास मारत असून पाण्याची चव देखील बिघडली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यापासुन पोटाचे तसेच विविध आजार होण्याची भीतीपोटी जारचे पाणी विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शहरातील नागरीक दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारास बळी पडण्याआधी जुन्नर पालीकेने तातडीने पाणी पुरवठ्यावर लक्ष्य केंद्रित करण्याची नागरिकांची मागणी आहे. केवळ पाणी पट्टीत वाढ करण्यापेक्षा नागरिकांना पुरेशा दाबाने नियमितपणे स्वच्छ व शुध्द पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावे व नागरीकांना आजारी पडण्यापासुन वाचवावे अशी नागरिकांची मागणी आहे .

Web Title: Dangerous water supply from Junnar municipality: citizen's complaint