दापोडी रस्ता धोकादायक स्थितीत

Road-Issue
Road-Issue

पिंपरी - मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते पिंपरीदरम्यानचा सेवा रस्ता आठ ठिकाणी खचला असल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्‍यता असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले. दरम्यान, सेवा रस्तादुरुस्तीचे आश्‍वासन मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही.

मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते पिंपरीदरम्यानचा ग्रेडसेपरेटर दिवसभर वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे सेवारस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्ता मोरवाडी परिसरात तीन ठिकाणी खचला आहे. तेथे मोठे खड्डे पडले असून त्यातील वाळू बाहेर आली आहे. पिंपरी कॅम्पकडे जाणारे या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. 

रस्त्याच्या लगतच मेट्रोच्या पिलर उभारणीचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरून जड वाहनांची ये-जा होते. त्याने हा रस्ता खचला आहे.

दापोडीजवळील सीएमई परिसरात एका ठिकाणी सेवारस्त्याची स्थिती खराब आहे. कासारवाडी परिसरातील सेवारस्त्याची चाळण झाली असून या भागातही चार ठिकाणी रस्ता खचला आहे. पुण्याहून पिंपरीकडे जाणारे वाहनचालक, भोसरी, मोशी भागात जाणाऱ्या पीएमपी बस याच रस्त्याचा वापर करतात.

दुरुस्तीचा दावा 
काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे मेट्रोचे काम सुरू असलेल्या परिसरातील रस्त्याची वाताहत झाली होती. त्यानंतर रस्ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेतल्याचा दावा मेट्रोकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र त्याची अवस्था खराब झाल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com