धामणीचे सरपंच पाण्यासाठी उतरले आडात

सुदाम बिडकर
रविवार, 17 जून 2018

आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील दुष्काळी गाव म्हणुन ओळख असलेल्या धामणी येथील सरपंच सागर जाधव हे नागरीकांची पाण्याची गैरसोय दुर करण्यासाठी अरुंद व 40 फुट खोल असलेल्या पाण्याच्या आडात उतरुन पडलेले लाकडी झाकण वर काढुन नागरिकांना पाणी वर काढण्याचा मार्ग मोकळा केला सागर जाधव यांनी पदाचा मोठेपणा न मिरवता स्वतः आडात उतरुन केलेल्या समाजकार्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
 

पारगाव, (पुणे) - आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील दुष्काळी गाव म्हणुन ओळख असलेल्या धामणी येथील सरपंच सागर जाधव हे नागरीकांची पाण्याची गैरसोय दुर करण्यासाठी अरुंद व 40 फुट खोल असलेल्या पाण्याच्या आडात उतरुन पडलेले लाकडी झाकण वर काढुन नागरिकांना पाणी वर काढण्याचा मार्ग मोकळा केला सागर जाधव यांनी पदाचा मोठेपणा न मिरवता स्वतः आडात उतरुन केलेल्या समाजकार्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

बाजारपेठेमधील संत सावतामाळी मंदिराजवळ एक जुना आड आहे लहान मुले खेळताना दुर्घटना घडु नये म्हणुन त्यावर लाकडाचे झाकण ठेवण्यात आले होते ते झाकण तुटून खाली पाण्यात पडले आणि ते पाण्याच्या थोडे वरच्या भागात जाऊन अडकले. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना पाणी ओढुन काढता येत नव्हते. वैभव विधाटे यांनी सरपंच सागर जाधव यांना हा प्रकार सांगीतल्यानंतर जाधव स्वतः कशाचीही पर्वा न करता 40 फुट खोल आडामध्ये उतरुन ती लाकडी फळी वर काढली आणी नागरिकांची पाण्याची गैरसोय दुर केली. यापुर्वीही सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त झाली असताना सरपंच सागर जाधव यांनी स्वतः चिखलात उतरुन पाईपलाईन दुरुस्त केली होती. 

Web Title: Dashmani sarpanch sagar jadhav work for his people