पोवाडा, लोकगीतांना रसिकांची दाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सकाळ इंडिया फाउंडेशनला मदत
सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक चळवळीला हातभार लावत कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने २५ गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांचा निधी फाउंडेशनला दिला आहे. यातून प्रत्येक विद्यार्थ्याला १० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

पुणे - पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीतांच्या बहारदार कार्यक्रमात रसिक तल्लीन झाले अन्‌ त्यांनी या कलाविष्काराला भरभरून दाद दिली. कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मंगळवारी गायक नंदेश उमप यांचा ‘मी मराठी’ हा मराठी सांगीतिक कार्यक्रम रंगला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दत्तजयंतीनिमित्त ट्रस्टतर्फे १२ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी त्याचे दुसरे पुष्प होते. उमप यांचा मराठी गीतांचा कार्यक्रम, विद्यार्थी अर्थसाह्य वाटप अन्‌ श्री गुरुमाहात्म्य दिनदर्शिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, अमोल मिटकरी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अंकुश काकडे, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागीरदार व इतर मान्यवर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dattajayanti sohala