Crime News : सवतीच्या सांगण्यावरून जावयाकडून मुलीचा खून; जावयासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा

पतीने-पत्नीचा डोक्यात दगड घालून खून करून त्यानंतर, पतीने झाडाला गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली होती.
Crime
Crimeesakal

पुणे/खडकवासला - पतीने-पत्नीचा डोक्यात दगड घालून खून करून त्यानंतर, पतीने झाडाला गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली होती. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, मुलीच्या सवतीच्या सांगण्यावरून जावयाने मुलीचा दगडाने ठेचून खून केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे.

सोमनाथ सखाराम वाघ (वय ५३, रा. वारजे माळवाडी) आणि त्याची पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. याबाबत सुवर्णाची आई ताराबाई बाळासाहेब इलग (वय ६०, रा. प्रतापपूर, आश्वी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मृत सोमनाथ वाघ याच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई यांची मुलगी सुवर्णाचे सोमनाथ वाघ याच्याशी लग्न झाले होते. परंतु सोमनाथचे पहिले लग्न झालेले आहे. सुवर्णाची सवत आणि तिची मुलगी जावई सोमनाथला माझ्या मुलीबद्दल वाईट सांगत होते. त्या दोघींचे ऐकून जावई मुलीला बेदम मारहाण करीत होता. तर त्या दोघी मुलीला सारखे टोमणे मारत होते. त्या दोघींच्या सांगण्यावरून जावयाने सुवर्णाला मारहाण केली होती.

दरम्यान, जावयाने रविवारी सकाळी फिरायला जाण्याच्या बहाण्याने सुवर्णाला दुचाकीवरून वारजे- कुडजे रस्त्यावरील कमळादेवी मंदिराचे पुढे, पिकॉक बे येथे नेले. तिथे रस्त्याच्या बाजूच्या झाडांमध्ये नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केला. त्यानंतर त्याने झाडाला पॅन्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com